ब्लॉग

  • प्राणायाम: प्रकार आणि त्याचे अद्भुत फायदे

    प्राणायाम: प्रकार आणि त्याचे अद्भुत फायदे

    प्राणायाम हा योगातील एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. ‘प्राण’ म्हणजे श्वास आणि ‘आयाम’ म्हणजे नियंत्रण, याचा अर्थ म्हणजे श्वासावर नियंत्रण ठेवून मन, शरीर आणि आत्मा यांचा समतोल साधण्याची पद्धत होय. आजच्या धकाधकीच्या जीवनात, मानसिक शांतता आणि शारीरिक आरोग्यासाठी प्राणायाम हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे. नियमित प्राणायाम केल्यास आपले मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्य निश्चितपणे सुधारते. या लेखात आपण प्रत्येक महत्त्वाच्या प्राणायामाचा योग्य सराव कसा करावा आणि त्याचे काय फायदे आहेत, यावर सविस्तर मार्गदर्शन पाहणार आहोत.

    प्रमुख प्राणायामाचे प्रकार आणि त्याचे फायदे

    १. अनुलोम-विलोम प्राणायाम (Nadi Shodhan)

    कृती: उजव्या नाकपुडीने श्वास आत घ्या (पूरक) आणि डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडा (रेचक). हा प्रक्रिया उलट क्रमाने करा. हे ५-१० वेळा करा.

    फायदे:नाडी शुद्धी,मनःशांती,मानसिक तणाव कमी होतो,रक्तदाब संतुलित राहतो.

    २. भस्त्रिका प्राणायाम

    कृती: दोन्ही नाकपुडींनी जोराने श्वास आत घ्या. आता शक्य तितक्या वेळ श्वास रोखा व बाहेर सोडा.असे १०-१५ वेळा रिपीट करा

    फायदे: शरीरातील ऑक्सिजन वाढतो, रक्ताभिसरण सुधारते,शरीरातील दोष निघून जातात,सर्दी, खोकल्यात उपयोगी.

    ३. उज्जायी प्राणायाम

    कृती: घशातून श्वास घ्या आणि बाहेर सोडा.श्वास घेताना ‘सा’ आवाज आणि सोडताना ‘हा’ आवाज यासारखा घशातून निघतो

    फायदे:थायरॉईड आणि इम्युनिटी सुधारते,मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो,चिंता, निद्रानाश कमी होतो.

    ४. भ्रमरी प्राणायाम

    कृती: श्वास घेतल्यावर बाहेर सोडताना मधमाशीसारखा ‘हम्म्म’ आवाज करा,डोळे बंद, कान बंद करून करा

    फायदे: मानसिक शांतता,डोकेदुखी, टेन्शन कमी होते,फोकस वाढतो.

    ५. शीतली प्राणायाम

    कृती: जिभ बाहेर काढून जीभेचा शेंडा वरच्या ओठावर ठेवा. तोंडाने थंड हवा आत घ्यानाकाने बाहेर सोडा

    फायदे:शरीरातील उष्णता कमी होते,रक्तदाब नियंत्रणात राहतो,त्वचेचे आरोग्य सुधारते.

    ६. शीतकारी प्राणायाम

    कृती: दातांमधून श्वास आत घ्या.नाकाने बाहेर सोडा

    फायदे: मन प्रसन्न होते,शरीर थंड होते,चिडचिडेपणा कमी होतो.

    ७. नाडी शुद्धी प्राणायाम (Advanced Level)

    नियम व काळजी:रिकाम्या पोटी प्राणायाम करा हळूहळू सराव वाढवा.डॉक्टरांचा सल्ला घ्या (हृदयरोग, रक्तदाब वगैरे असल्यास)

    फायदे: शरीरातील नाड्यांचे शुद्धीकरण,आत्मिक प्रगती,ध्यानासाठी तयार करते.

    About

    मी एक योगप्रेमी, ध्यानसाधिका आणि अध्यात्मिक वाटचाल करणारी साधिका आहे. ‘Yogsathi’ या ब्लॉगच्या माध्यमातून योग, प्राणायाम, ध्यान आणि मानसिक स्वास्थ्य यावर आधारित माहिती व अनुभव मी तुमच्याशी शेअर करते. भारतीय संस्कृतीतील योगशास्त्राचे गूढ उलगडत मी प्रामाणिकपणे या माध्यमातून सेवा करत आहे.

    आपण जर अध्यात्म, योग आणि अंतर्मुख होण्याच्या मार्गावर असाल, तर हा ब्लॉग आणि चॅनेल तुमच्यासाठीच आहे.

    धन्यवाद!
    श्री स्वामी समर्थ! जय जय स्वामी समर्थ!🙏

  • नियमित सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

    नियमित सूर्यनमस्कार करण्याचे फायदे

    सूर्यनमस्कार एक जुनी योगपद्धत आहे जी आपल्यावर सकारात्मक परिणाम करते. रोज सूर्यYogsathiनमस्कार केल्याने आरोग्य सुधारते. या लेखात, शरीर आणि मनावर होणाऱ्या बदलांची माहिती दिली आहे.

    १. शारीरिक फायदे (Physical Benefits):

    • संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो – स्नायू बळकट होतात.
    • लवचिकता वाढते, सडपातळ बांधा तयार होतो.
    • हृदयाची क्रिया सुधारते, रक्ताभिसरण सुरळीत होते.
    • पचनसंस्था बळकट होते, बद्धकोष्ठता दूर होते.
    • थकवा, आळस कमी होतो.
    • वजन नियंत्रणात येते.

    २. मानसिक फायदे (Mental Benefits):

    • मन शांत होते,
    • विचारसरणी स्पष्ट होते.तणाव,
    • चिंता कमी होते.
    • भावनिक समतोल साधला जातो.
    • एकाग्रता वाढते.
    • आत्मविश्वासात वाढ होते.
    • सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.

    ३. नियमित सूर्यनमस्कार केल्याचे फायदे (Long-term Benefits):

    • शरीर-मन-श्वास यांचे एकात्मिक संतुलन निर्माण होते.
    • आत्मभान जागृत होते.
    • दिनचर्येला शिस्त लागते.
    • आंतरिक शक्तीचा अनुभव येतो.

    सूर्यनमस्कार ही केवळ व्यायामाची पद्धत नसून, ती एक जीवनशैली आहे. दिवसाची सुरुवात सूर्यनमस्काराने केली तर शरीर आरोग्यदायी, मन स्थिर आणि आत्मा प्रफुल्लित राहतो.

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया